आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये शिक्षकांचा सन्मान:शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावी; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांना न्यायदानाच्या कामासोबतच शासनाने नेमून दिलेली अवांतर कामे सुध्दा करावी लागतात. अशी कामे करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावीत. अडचणी प्रत्येक विभागात असतात. त्यातुन मार्ग काढून काम करत रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयत आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कुडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, साहित्यिक संजय कळमकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले पुढे म्हणाले, शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात तसेच ते उद्याचा उत्तम नागरिक घडविण्याचे काम करीत असतात, असे यावेळी ते म्हणाले. पूर्वीची गुरुकुल शिक्षण पद्धती कशी महत्त्वाची होती. याबाबत त्यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. भोसले यांनी शिक्षकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.शिक्षक दिनाच्या निमित्त सर्व शिक्षकांचे डॉ. राजेंद्र भोसले यांनी अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

यंदा जिल्हयातील एकूण 16 जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असुन, प्राथमिक शाळेतील 14आदर्श शिक्षकांचा आणि माध्यमिक शाळेतील 2 आदर्श शिक्षक यांचा यावेळी डॉ. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्त सर्व शिक्षकांचे जिल्हाधिका-यांनी अभिनंदन करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...