आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला दिनाचे औचित्य साधून नगरच्या माहेश्वरी महिला संघटन, राजस्थानी बहू मंडळ व प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात स्वकर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. पोस्को कायद्या बाबत जनजागृती करणाऱ्या ''अभया'' या एकपात्री नाटकाच्या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ रामनाथ धूत ऑडिटोरियम येथे झालेल्या कार्यक्रमात अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या अभया नाटकाने उपस्थित महिला भावूक झाल्या. महिलांसाठी काम करणाऱ्या माहेश्वरी महिला संघटन, राजस्थानी बहू मंडळ व प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या या तीन संस्था एकत्र येत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये स्वच्छता अभियान व जनजागृती करणाऱ्या प्रतिभा धूत, हास्य क्लब व योग शिक्षिका मनीषा गुगळे, प्लास्टिक हटाव मोहीम राबवणाऱ्या श्रद्धा बिहाणाी व शैक्षणिक कार्यातील योगदाना बद्दल अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या छाया फिरोदिया आदी स्वकर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
बालीकांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी म्हणून तयार करण्यात आलेल्या पोस्को कायद्या बाबत जनजागृती करणाऱ्या ‘अभया’ या एकपात्री नाटकात अत्याचार झालेल्या सोळा वर्षांच्या अभयाने धैर्याने दिलेला कायदेशीर लढा पाहून उपस्थित महिला भाऊक झाल्या. चिन्मयी स्वामी हिने उत्कृष्ट अभिनय केला. यावेळी अहमदनगर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या उपाध्यक्षपदी शोभा काबरा, सचिवपदी सुरेखा मणियार व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुखपदी सुनीता मनियार यांची निवड झाली. त्याचबरोबर नगर तालुका महिला माहेश्वरी संघटनेच्या अध्यक्षपदी गीता गिल्डा यांची निवड झाली.
यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष निर्मला बंग, सुरेखा मणियार, अर्चना लड्डा, स्नेहलता सोमाणी, शोभा काकाणी, पूजा गिल्डा, गीतांजली मणियार, कविता काकाणी, गायत्री पल्लोड, संगीता सिकची, नंदा सोमाणी, कविता मंत्री, सारसनगर महिला मंडळाच्या स्वाती नागोरी, उज्ज्वला मालू,नीलमणी गांधी, शोभा झंवर व काविओता मंत्री तसेच अभया नाटकाचे सहाय्यक नीलेश बोडले आदींचा सन्मान या कार्यक्रमात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.