आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या सैनिकांनी मोठ्या कौशल्याने सांभाळली आहे. देश रक्षणासाठी दुष्मनांशी लढताना वीरगतीस प्राप्त होत आहेत. शहीद दिनानिमित्त शहीद जवानांच्या वीरपत्नींचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करुन रेणुकामाता मल्टीस्टेटने सामाजिक दायित्व जपले आहे. शहीद जवानांच्या पत्नींचा केलेला सन्मान खरोखरच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार पॅनेल अॅड. राजमोहन येनगंदुल यांनी काढले. रेणुकामाता मल्टीस्टेट आडते बाजार शाखेच्या वतीने ‘शहीद जवान दिना’निमित्त भारतीय सीमेचे रक्षण करताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अॅड. राजमोहन येनगंदुल, वीरपत्नी गंगूबाई खाकाळ, सुरेखा ठाणगे, माजी सैनिक नंदकुमार गुंड, शाखा व्यवस्थापक दत्तात्रेय अंकम, प्रिया कसबे, सतीश उरणकर आदी उपस्थित होते.
प्रास्तविकात शाखा व्यवस्थापक दत्तात्रेय अंकम यांनी संस्थेच्या विविध सेवा-सुविधा, ठेवी, कर्जविषयक माहिती दिली. संस्थेचे चेअरमन प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. या वेळी वीरपत्नी गंगूबाई खाकाळ यांनी मनोगतातून सांगितले, की लग्नापूर्वी मला कळले की, हे फौजीमध्ये आहे, तेव्हा युनिफॉर्ममुळे आपुलकी वाटली.
आमचे दिवाळी-दसरा हे सण कॅलेंडरप्रमाणे नव्हे, तर जेव्हा सुटीवर घरी येतात, तेव्हा साजरे करतो. पुढील सात जन्म फौजीबरोबरच लग्न करीन. सुरेखा ठाणगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नंदकुमार गुंड यांनीही सीमेवर लढतांना अनेक प्रसंगाना तोंड देतांना आलेले थरारक अनुभव कथन केले. सूत्रसंचालन सचिन राठोड यांनी, सतीश उरणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रिया कसबे, अजहर सय्यद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.