आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घाला:कंटेनर-अॅपे रिक्षाचा भीषण अपघात; सात जण ठार, तर सहा गंभीर जखमी; मृतांत पाच महिला, दोन पुरुषांचा समावेश, एका दांपत्यांचाही मृत्यू

कोपरगाव शहर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात झगडे फाटा कोपरगाव महामार्गावर पगारे वस्ती नजीक कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या अपघातात सात जण ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेरनरने (पीबी ०५ एबी ४००६) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला कट मारून कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला (एमएच १७ एजे ९०५६) धडक दिली.

या अपघातात रिक्षामधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात दाखल केलेल्यांपैकी तीन अशा सात जणांचा मृत्यू झाला. रिक्षातील तीन प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे असे सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये २ महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा समावेश आहे. या अपघातातील मृतांमध्ये राजाबाई साहेबराव खरात (वय ६०, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५ रा. वावी, ता. सिन्नर),पूजा नानासाहेब गायकवाड (वय २०, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय २०, रा. चांदेकसारे), शैला शिवाजी खरात (वय ४२ रा. श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (वय ५२ रा. श्रीरामपूर), रुपाली सागर राठोड (वय ४०, रा. सिन्नर) या सात यांचा सामावेश आहे. रिक्षामध्ये एकूण दहाजण होते. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला.

मोटारसायकलवरील तिघेही जखमी आहेत. अपघात करून कंटेनरचा चालक दर्शनसिंग गजनसिंग (वय ४२, रा. दानामंडी, लुधियाना, पंजाब) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास कोपरगाव पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...