आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ. सुजय विखे यांचे संकेत:शिर्डीतील नाल्यावरील हॉटेलची अतिक्रमणे तोडणार

नवनाथ दिघे | शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुणाचाही विचार न करता शिर्डी शहरातील ओढ्या, नाल्यावरील अनधिकृत हॉटेलची बांधकामे तसेच वॉल कंपाउंडची अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत तोडणार आहे. यासाठी आम्ही मोठी मोहीम हाती घेतली आहे, असे सूतोवाच नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे िदले. यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.

बुधवारी (३१ ऑगस्ट) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शिर्डी शहरात पावसाच्या पाण्याने दाणादाण उडवली. श्रीरामनगर, सीतानगर, आंबेडकरनगर, लक्ष्मीनगर, मातोश्रीनगर आदी भागातील अनेक घरांत पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठे हाल झाले. त्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. विखे यांनी शुक्रवारी शिर्डीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. याप्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, ज्येष्ठ नेते कैलास कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अभय शेळके, गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, ज्ञानेश्वर गोंदकर, नितीन कोते, जगन्नाथ गोंदकर आदी उपस्थित होते.

या वेळी कनकुरी रोडलगत असलेल्या ओढ्याची तसेच नांदुर्खी पाटातून दक्षिण बाजूने शिर्डीत येणाऱ्या पाण्याची पाहणी खासदार विखेंनी केली आहे. शिर्डी शहरातील लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे लक्ष्मीनगर येथील नागरिकांच्या घरात पाहणी करून येथील सर्व नागरिकांना एकसमान मदत देण्यात येईल, असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब योजनेंतर्गत २४ तासांत बाधित कुटुंबाला दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ वाटप करण्याचे आदेश दिले. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून तीन वेळा नाष्टा पाकिटे देण्यात यावीत, अशा सूचना नगर परिषद प्रशासनाला करून पिण्याचे पाणीही सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या नागरिकांना शासन नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन विखे यांनी दिले.

निघोज, रुई, शिंगवे परिसरात नाल्याचे अस्तित्वच नाही - आता कारवाई होणार साईंच्या हयातीत नाला गोदेपर्यंत २० किमी साईबाबांच्या हयातीमध्ये शिर्डीतील नाला गोदावरीपर्यंत २० किमी अंतराचा होता. शिर्डीच्या आजूबाजूला चार ते पाच ठिकाणी छोट्या छोट्या नळ्या टाकून अंडरग्राउंड प्रवाह केला. त्यावर पक्क्या तारांकित हॉटेलची निर्मिती केली. शिर्डीच्या पुढे निघोज, रुई, शिंगवे परिसरात तर नाल्याचे अस्तित्वच दिसत नाही. शेतकऱ्यांनी नाल्यावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर केली. या सर्व प्रकारामुळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी शिर्डीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नाल्यातून पावसाचे पाणी शहरात शिर्डी विमानतळ परिसरातील काकडीपासून उगम पावणारा नाला पुढे नांदुर्खी मार्गे शिर्डी आणि पुढे शिंगवे मार्गे गोदावरीपर्यंत जातो. मात्र विमानतळ ते शिर्डीपर्यंत नाल्याचे अस्तित्वच राहिले नसल्याने पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह शिर्डीत दाखल होत असल्याचे संकट आहे.

नाल्याला नैसर्गिक प्रवाह देणार * नाल्याचा प्रवाह नैसर्गिक करण्यासाठी सर्व अडथळे दूर करण्यासाठी पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणी भूमी आलेख आदी विभागांची मदत घेऊन शहरातील नाल्याचा लवकरच नकाशा बनवला जाणार आहे. गोविंद शिंदे ,प्रांताधिकारी, शिर्डी.

असे आहे अतिक्रमण -शिर्डी आणि निघोज परिसरात पाच ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण करून इमारती बांधल्या. - नाल्यालगत जवळपास २०० घरांची अतिक्रमणे - एअरपोर्ट ते शिर्डी नाल्याचे अस्तित्व संपुष्टात - शिर्डीच्या पुढे निघोज, रुई, शिंगवे परिसरात नाल्याचे अस्तित्व नाही . - नैसर्गिक प्रवाह नसल्याने एअरपोर्ट, नांदुर्खी परिसरातील पाणी शिर्डीत येत असल्याने मोठी समस्या -अनेक ठिकाणी नैसर्गिक प्रवाह वळवून अतिक्रमणे

बातम्या आणखी आहेत...