आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी प्रथमच सहभाग घेत उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष वेधले. चांगल्या गोष्टींचे कौतूक करताना त्यांनी काही त्रुटी दाखवून देत त्या दूर करण्याची सरकारला विनंती केली. ७५ हजार पदांच्या नोकर भरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ती कधी होणार, कशी होणार याबद्दल अभिभाषणात उल्लेख नव्हता. यामुळे २ लाखांपेक्षा जास्त रिक्त पदांवर ७५ हजार जागांच्या भरतीने युवकांना न्याय मिळणार आहे?, असा सवालही केला. आमदार तांबे म्हणाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसत नाही. कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. यामुळे मध्यप्रदेश सरकारने वयाची अट ३ वर्ष, राजस्थानने ४ वर्ष तर आंध्र प्रदेशने २ वर्ष शिथील केली. मात्र, राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधान परिषदेला मोठी ऐतिहासिक परंपरा असून या सधनात काम करण्याची संधी मिळाली हा सन्मान विद्यार्थी दशेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आहे. राज्याच्या विकासाचा समतोल साधण्याची गरज असून दावोसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींच्या एमओयूंचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात होता. कंपन्या येतात, फोटोसेशन होतात, एमओयू होतात, सरकार कोणाचेही असो प्रत्यक्षात किती उद्योग येतात हा मोठा संशोधनाचा विषय आहे.या उद्योगातून किती रोजगार निर्मिती झाली हे कळू शकले नाही. हे उद्योग ठरावीक एमआयडीसीमध्येच येतात. ते सर्व जिल्ह्यांमध्ये यावेत, यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही, असा सवाल केला.
जुन्या पेन्शनचा निर्णय त्वरित घ्या जुन्या पेन्शनची योजना ज्वलंत मुद्दा बनला आहे. राजस्थानात ही योजना लागू झाली. हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल याच मुद्दामुळे बदलला. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत या योजनेचा मुद्दा ज्वलंत बनला होता. यामुळे निश्चितच आर्थिक भार पडणार आहे. मात्र, जो कर्मचारी जीवाचे रान करून काम करतो, त्याला न्याय देण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावे लागतील, असे तांबे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.