आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 नोव्हेंबरला सुनावणी:जरे हत्याकांडातून वगळण्याची तिघांची मागणी फेटाळली

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यातून वगळण्याची शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चकाली व अब्दुलरहेमान अब्दुल आरिफ (तिघेही रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश) या तीन आरोपींनी केलेली मागणी न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. या प्रकरणी आता येत्या ३० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने रेखा जरे हत्याकांड खटला नाशिक किंवा ठाणे न्यायालयात वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. यात फिर्यादी सिंधूताई वायकर यांच्यावतीने वकीलपत्र दाखल केल्याची माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी दिली. या याचिकेची प्राथमिक सुनावणी प्रतीक्षेत आहे.

जरे हत्याकांड प्रकरणाचा सूत्रधार बाळ ज. बोठे याला फरार असतानाच्या काळात मदत केल्याबद्दल शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजयचकाली व अब्दुलरहेमान अब्दुल आरिफ यांचा या गुुन्ह्याच्या आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा करीत या गुन्ह्यातून वगळण्याची मागणी त्यांनी केली होती. सुनावणीनंतर निकाल प्रतीक्षेत होता. न्यायालयाने तीनही आरोपींची मागणी फेटाळली असल्याचे अ‍ॅड. पटेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...