आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावी पेपरफुटी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात अहमदनगरच्या रुई छत्तीसी येथील आनंद इंग्लिश विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व पेपरफुटीचे प्रकरण गृह विभागाकडून अतिशय गोपनीय पद्धतीने हाताळले जात आहे.
बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये नुकताच बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली होती. पेपरच्या दिवशी सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर हा पेपर व्हायरल करण्यात आला होता. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
यांना अटक
परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. आणि अशाप्रकारे एकाकडून दुसऱ्याला हा पेपर पाठवत तो व्हायरल करण्यात आला. आरोपींनी प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर यांना अटक करण्यात आली आहे.
दादरमधून तपास
गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला मिळालेली प्रश्नपत्रिका ही नगरमधील आरोपींकडून मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकांसह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केली आहे.
विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षादरम्यान गोंधळाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याआधी बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता. विधानसभेतही पेपर फुटीचे पडसाद उमटले होते. पेपरफुटीवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
केंद्र संचालकात तात्काळ बदल
अमरावती विभागाच्या सचिवांनी पत्रक काढून सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकात तात्काळ बदल केला आहे. इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्यास सांगण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.