आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्यावरून वाद:श्रीरामपूर शहरात मनसेच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले हनुमान चालिसा पठण

श्रीरामपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मशिदीवरील भोंगे त्वरित हटवण्यात यावे, यासाठी मनसेच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामुदायिक हनुमान चालीसा पठण केले. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांचेसह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी बाबासाहेब शिंदे म्हणाले, जोपर्यंत हे सरकार मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरू राहणार आहे. जर हे सरकार हनुमान चालीसा विरोध करत असेल, तर जशास तसे उतर देऊ. दरम्यान, बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या आवाजात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी निघाले असता राम मंदिर चौकात पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी बाबासाहेब शिंदे यांना विनंती केली की, आम्ही देखील तुमच्या बरोबर हनुमान चालीसा पठण करू.

राममंदिराजवळ हनुमान चालीसा पठण करावे, यावर बाबासाहेब शिंदे म्हणाले की, आम्ही धार्मिक भावना दुखावल्या जाईल, असे कोणतेही कृत्य करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज रोडवर जाऊन बाबासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, संतोष डहाळे, शहराध्यक्ष नीलेश लांबोळे, गणेश दिवसे, विकी राऊत विशाल लोंढे, डॉ. संजय नवथर, सागर बोंडगे, संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, नीलेश सोनवणे, मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, रतन वर्मा, विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे, शुभम शिंदे, मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण केले.

बातम्या आणखी आहेत...