आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाडव्याला राज्यात मंदिरं सुरू करण्यात आल्यानंतर भाजप नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. सोबतच भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा परिणाम असल्याचा दावाही केला. यावर धार्मिक स्थळे सुरू झाल्यानंतर भाजपकडून त्याचे श्रेय घेत आमच्यामुळे हे शक्य झाले अशी तुतारी वाजवू नये, असे मत राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले. भाजपने नेहमीप्रमाणे येथेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोलाही त्यांनी हाणला.
राज्यात कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी गर्दीची ठिकाणं धार्मिक स्थळी बंद करण्यात आली होती. त्यानंतर िमशन बिगिन अगेनमध्ये राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले. परंतु, धार्मिक स्थळं उघडण्याचा िनर्णय घेतला नव्हता. दुसरीकडे मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात यावी यासाठी भाजप आणि विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. दरम्यान िदवाळी पाडव्यापासून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देण्यात आली. अन् सोमवारी १६ नोव्हेंबरला धार्मिक स्थळे सकाळपासून खुली करण्यात आली. यावरून आता श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यावरूनच आ. रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मी केली होती मागणी
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मी देखील मागणी केली होती. याची आठवणही रोहित पवार यांनी करून िदली. राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याबाबत माझ्यासह इतरांनीही जी विनंती केली, त्यानुषंगानेच आजपासून ती सुरू झाली, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.