आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:शिक्षक बँकेच्या राजकारणात इब्टाचा बिनविरोधचा प्रस्ताव ; बिनविरोध करत असाल तर एकही जागा न घेता पाठिंबा देऊ

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी सर्व संघटनांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांनी स्पष्ट केले. त्यावर गुरुमाऊली मंडळाचे बापू तांबे यांनी बिनविरोध होत असेल तर आम्हाला एकही जागा नको, असे ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. तर गुरूकुल मंडळाने स्वबळाच्या डरकाळ्यांचा उल्लेख करत कोणीच कमी समजायला तयार नाही अशी टिप्पणी करतानाच, बिनविरोधला पाठिंबाही दर्शवला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम दोन दिवसांत अधिकृत जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु, शिक्षक नेत्यांनी निवडणुकीची तारीख २४ जुलै गृहित धरून तयारीही सुरू केली आहे. स्वबळाच्या डरकाळ्या फोडून आतून युती-आघाडीसाठी पायघड्या टाकल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आहे. त्यातच आता इब्टा संघटनेने बिनविरोधचे आवाहन केल्यामुळे कोणतीही संघटना जाहीर या भूमिकेला जाहीर विरोध करण्यास तयार नाही. या आवाहनाला संघटना किती प्रतिसाद देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर म्हटले आहे की, शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी इब्टा संघटनेने पुढाकार घेतला असून इतर प्राथमिक शिक्षक संघटनांची भेट घेऊन बिनविरोधसाठी चर्चा केली जाईल. सभासदांच्या हिताच्या कारभारासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यास बँकेची प्रतिष्ठा राज्यभर वाढेल या निवडणुकीत होणारा खर्च टाळता येईल. जर बँक बिनविरोध होत असेल तर आम्ही निवडणूक रिंगणातून बाहेर जाऊ असे सांगितले. तसेच उपाध्यक्ष आबा लोंढे, राज्य कार्यकारणी सदस्य रमेश सोनवणे यांनीही तशी माहिती दिली. दिव्य मराठीने याबाबत इतर काही मंडळांतील नेत्यांचे मत जाणून घेतले. गुरूमाऊलीचे बापू तांबे यांनी त्यांच्या मंडळाचा पूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच बिनविरोध होत असेल आम्हाला एकही जागा नको, अशी भूमिकाही स्पष्ट केली. तर गुरूकुलचे नेते संजय कळमकर यांनी, इतर मंडळांकडून होत असलेल्या स्वबळाच्या डरकाळ्यांचा संदर्भ देत कोणची कमी समजायला तयार नसल्याचे सांगितले. त्याबरोबरच बिनविरोधला पाठिंबाही दर्शवला आहे. सदिच्छाचे राजेंद्र शिंदें यांनी वैचारिक मतभेदाचा मुद्दा ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडून बिनविरोधला सहमीती दर्शवली.

बिनविरोध निवडणुकीला आमचा पूर्ण पाठिंबा ^ बिनविरोध होत असेल तर आमच्या मंडळाचा पूर्ण पाठिंबा आहे. निवडणूक बिनविरोध होत असेल तर आमच्या मंडळाचा, एकही जागा न घेता बिनविरोधच्या प्रस्तावाला पाठिंबा राहील.'' बापू तांबे, गुरूमाऊली मंडळ.

कोणीच कमी समजायला तयार नाही ^ मंडळांनी त्यांच्यातील खरी क्षमता कबूल केली, तर बिनविरोध होऊ शकते. परंतु, कोणीच स्वत:ला कमी समजायला तयार नाही, हे स्वबळाच्या डरकाळ्यावरून स्पष्ट होते. पण आम्ही बिनविरोधला तयार आहोत.'' संजय कळमकर, गुरूकुल.

बातम्या आणखी आहेत...