आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:वनविभागातील गैरव्यवहारप्रकरणी दोषींना पाठीशी घातले, तर न्यायालयात जाणार; वनपरिमंडळ अधिकारी भोसले यांचा इशारा

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभागामार्फत सुपा वनपरिमंडळात मातीनाला बांध व गॅबियन बंधाऱ्याच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या चौकशीत दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास उच्चन्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पत्र वनपरिमंडळ अधिकारी एस. एस. भोसले यांनी शुक्रवारी (१ एप्रिल) सहाय्यक वनसंरक्षकांना दिल्याने, चौकशी समितीच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मातीनाला बांध व गॅबियन बंधाऱ्यांची कामे पूर्ण नसताना परस्पर रोख लेखा तयार करण्यात आला. तसेच ज्या मजुरांनी प्रत्यक्ष जागेवर कामे केली, त्यांच्या नावे रोखा न वापरता ज्यांनी कामे केली नाहीत, त्या मजुरांची नावे वापरून खोटा रोखा लेखा सादर केल्याची तक्रारी वनपाल भोसले यांनी केली होती. या प्रकरणात आमदार निलेश लंके यांनीही वाळवणे येथील फॉरेस्ट गट नंबर ७३८ मध्ये झालेल्या कामाची पाहणी केली. याप्रकरणी आमदार लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी समिती स्थापन करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे सांगितले. त्यानुसार २६ मार्चला चौकशी समिती वाळवणे येथे पोहोचली.

कामाचे मोजमाप पुस्तिकेनुसार प्रत्यक्ष बंधाऱ्याचे मोजमाप जागेवर आहे का याची पडताळणी करण्याची मागणी केली. मोजमाप बरोबर नसताना कोणत्या आधारे तपासणी करता असा सवालही भोसले यांनी चौकशीस आलेल्या अधिकाऱ्यांना केला. त्यावर माझ्या विरोधात लेखी तक्रार करा असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले आहे. रोखा लेख्यामधील मजुरांची ओळख आमदार नीलेश लंके व वनपाल सुपा यांच्या समक्ष घेतल्यास सत्य समोर येईल. चौकशीत दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास न्यायालयात याचिका दाखल करू, असेही भोसले यांनी पत्रात स्पष्ट केले. दबाव आल्यास वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीव गमवावा लागेल, त्याला चौकशी समितीमधील अधिकारी जबाबदार राहतील, असेही पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...