आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील पाच वर्ष नगरपालिकेची सत्ता असताना देखील कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेत आहे. या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाला सूचना देऊन या समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. मागील पाच वर्ष प्रभागाचा विकास करू न शकलेल्या विरोधकांना मात्र हे सहन होत नाही व नागरिकांच्या अडचणी सुटत आहेत, याचे त्यांना दुःख वाटत आहे. त्यामुळे विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अपयश दुसऱ्यावर लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. जर मागील पाच वर्षे त्यांनी प्रभागात विकासकामे केली असती तर प्रभागाची समस्या नगरी झाली नसती अशी उपरोधिक टीका कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केली.
आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अडचणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाणून घेत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सूचना देऊन ते प्रश्न सोडवले जात आहे. त्यांनी जुन्या प्रभाग क्रमांक चारमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना नागरिकांनी त्यांच्या पुढे समस्यांचा पाढा वाचला. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकपणे ही टीका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.