आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज आपण आधुनिक समाज निर्माण झाला असल्याचे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात तसे आहे का. मुलगी झाल्यानंतर अनेकजण नाराज होतात. मुलगा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही पणती आहे. मुलांवर चांगले संस्कार करुन आपल्या संस्कृती रक्षणाचे फार मोठे काम स्त्रिया करत आहेत. मुलीच अभ्यासातील प्रगती आणि विविध परिक्षांतील यश कुटुंबाबरोबरच शाळेचे नाव चमकवत आहेत. त्यामुळे मुलींना प्रोत्साहन दिल्यास कोणत्याही क्षेत्रात त्या यशस्वी होतील, असा शंका नाही, असे प्रतिपादन डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. यावेळी त्यांनी मुलींचा सन्मान करण्याची शपथ उपस्थितांना दिली.ग. ज. चितांबर कन्या विद्या मंदिरयेथे '' बेटी बचाओ... बेटी पढाव'' हाउपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगीरोटरी क्लबचे अध्यक्ष पुरुषोत्तमजाधव, नीलेश वैकर, प्रिती बोरकर,अनघा राऊत, साधना देशमुख, नेहा जाधव, मुख्याध्यपिका विभावरी रोकडे आदि उपस्थित होते.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, शालेयतसेच महाविद्यालयापासून अनेकपरिक्षांत मुलीच बाजी मारताना दिसतआहेत. त्यामुळे मुलींच्या कर्तृत्वालाआपणही प्रोत्साहन दिले पाहिजे.सरकारही यासाठी विविध पातळ्यांवरप्रयत्न करत आहेत. बेटी बचाओ...बेटी पढाओ... हे अभियान प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे. स्त्रीयांनीच याबाबत आणखी पुढाकार घेऊन मुलगा-मुलगीमध्ये भेदभाव न करता त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याप्रसंगी ज्या घरात फक्त मुली आहेत, अशांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी विद्यालयात मुलींच्या प्रगतीचा आढावा सादर केला. याप्रसंगी मंजूषा जोशी, गणेश उघडे, सोपानदेव शिंदे, अरुण इघे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.