आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र उत्सव:गणेश मंडळांनी अनधिकृत वीज घेतल्यास कारवाई ; अधिकृत वीज जोड घ्यावा : महावितरण

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

गणेशोत्सव. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत उत्साहात साजरा होणार आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी ४ रुपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रती युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही.

घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे गणेश मंडळांना स्वस्त वीज देण्याचा पर्याय दिला आहे. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांत तडजोड करू नये. संभाव्य धोके टाळण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...