आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीसाठा:पाऊस लांबल्यास खासगी पाणीसाठे ताब्यात घेणार ; प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात असलेल्या भंडारदरा, मुळा, निळवंडे या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. पाऊस लांबल्यास या धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. शनिवारपर्यंत नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात ३२ टक्के तर भंडारदरा धरणात २४ टक्के साठा आहे. निळवंडे धरणात मात्र ४५ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी अतिरिक्त पाणी या निळवंडे प्रकल्पात सोडले होते. त्यामुळे या धरणात सध्या अधिक पाणीसाठा आहे. आगामी काही दिवसात पावसाने ओढ दिल्यास जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. खासगी पाणीसाठेही आरक्षण करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १ ते १७ जून अखेरपर्यंत ४० मिलिमीटर पेक्षाही कमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने धरणांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. गेेल्या आठ दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळेच धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत आहे. आगामी काळात जिल्ह्यात पाऊस लांबल्यास धरणातील पाणीसाठा हा केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात बाबतचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

कमिटी घेणार निर्णय धरणांतील मृत पाणी साठा हा आरक्षितच ठेवण्यात येतो. भविष्यात नगर जिल्ह्यात पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा आरक्षित ठेवण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कमिटी निर्णय घेईल. वेळ पडल्यास खासगी पाणीसाठेही ताब्यात घेतले जातील, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...