आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागेबाबा पतसंस्थेने सुरुवाती पासूनच चांगल्या हेतूने चांगले काम केले आहे. त्यामुळे जे-जे नागेबाबा परिवाराशी जोडले गेले आहेत त्यांना कधीच काहीच कमी पडणार नाही, असे प्रतिपदान भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांनी केले. या संस्थेने देशातील ५७ शाखांच्या माध्यमातून एकही दिवस सुट्टी न घेता वर्षाचे ३६५ दिवस रोज १२ तास सेवा देत ६ लाखापेक्षा अधिक ग्राहकांना तब्बल ४३८० तास ग्राहक सेवा दिली. याची दखल ‘वर्ल्ड रेकाँर्डस् इंडीया’ या ऑर्गनायझेशनने घेवून नागेबाबा संस्थेस सर्वात जास्त वेळ ग्राहक सेवेच्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र दिले.
रामयणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे हस्ते व वर्ल्ड रेकाँर्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष पवनकुमार सोलंकी यांच्या उपस्थितित नागेबाबा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कडूभाऊ काळे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन केशव महाराज उखळीकर बोलत होते. यावेळी महानुभावपंथी परांडेकर बाबा, भरत दारुंटे, अनिल कदम, अक्षय काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उखळीकर महाराज म्हणाले, नागेबाबांचे अधिष्ठान असलेली पतसंस्था चंद्र-सूर्य असेपर्यंत असणार आहे. कडूभाऊ काळेंचे काम माझं काहीच नाही, सर्व काही तुमचेच आहे, असेच असल्याने यश त्यांच्यामागे चालून येते. त्यामुळे नागेबाबा संस्थेच्या शाखा भारतासह परदेशातही निघतील व तेथील लोकही या संस्थेचे कौतुकच करतील.
समाधान महाराज शर्मा म्हणाले, कडूभाऊ यांनी कधीही कोणाचाच तिरस्कार केला नाही. कोणावर भारही दिला नाही, उलट सर्वसामान्यांना आधारच दिला आहे. एकट्या माणसाने सुरु केलेली ही संस्था आज मोठ्या परिवारात रुपांतरीत झाली आहे. कडूभाऊंना अहंकार नाही. यातच त्यांचा मोठेपणा दिसतो. प्रास्ताविकात कडूभाऊ काळे म्हणाले, नागेबाबा परिवारातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक, मानसिक, वैचारिक सामाजिक, शारीरीक व आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
नुसतीच अर्थ सेवा न देता अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये नागेबाबा पुढे आहे. सध्या नागरीकांना चांगल्या सेवेची खूप गरज आहे. करोना संकट काळातही हॉस्पिटलमध्ये जाऊन नागरिकांच्या आर्थिक आम्ही गरजा पूर्ण केल्या. यासर्व कामाचे ‘वर्ल्ड रेकाँर्डस् इंडीया’ संस्थेने दोन महिने सर्वेक्षण करून विश्वविक्रमाचा पुरस्कार दिला. या पुरस्काराचे खरे मानकरी संस्थेच्या सर्व शाखांमधील सर्व कर्मचारीच आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. तर संजय मनवेलीकर यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.