आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:चोरीचा तपास न लागल्यास उपोषण, रास्ता रोको; अशी आंदोलनांची मालिका सुरू करू

पारनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेरचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिरातील चोरीचा तपास तातडीने लावावा. चोरांना जेरबंद करून चोरीस गेलेले पिंड व पार्वतीच्या तांदळ्यावरील चांदीचे आवरण हस्तगत करावे अन्यथा उपोषण, शहर बंद, रास्ता रोको, अशी आंदोलनांची मालिका सुरू कर, असा इशारा ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला. चार दिवसांपूर्वी,१७ नोव्हेंबर रोजी रात्री श्रीनागेश्वर मंदिरातील पिंड व पार्वतीच्या तांदळ्यावरील सुमारे दहा किलो वजनाचे, साडेसात लाख रुपये किंमतीचे चांदीचे आवरण चोरट्यांनी लांबवले.या चोरीच्या तपासात अद्याप कोणतीही प्रगती झालेली नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी पोलिस निरीक्षक बळप यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. २०१५ साली पार्वतीच्या तांदळ्यावरील चांदीच्या आवरणाची चोरी झाली होती. त्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा चोरी झाली आहे.

ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. चोरीचा तपास लावावा अन्यथा उपोषण, पारनेर शहर बंद, रास्ता रोको अशा विविध मार्गांनी आंदोलनांची मालिका सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, शिक्षक नेते रा. या. औटी, विश्वस्त संजय वाघमारे,शिरिष शेटिया, दत्ता अंबुले,शाहिर भास्कर गायकवाड, डॉ.बाळासाहेब कावरे, नगरसेवक अशोक चेडे,योगेश मते, भूषण शेलार,शांताराम रायसोनी, दिनकर बडवे, विजय डोळ, उदय शेरकर, सचिन औटी, नंदकुमार औटी, बाळासाहेब नगरे, श्रीकांत चौरे, सचिन नगरे,अकील शेख, विनोद गोळे, संजय देशमुख,बंडू गायकवाड, राजू शेख, सतीश म्हस्के, कल्याण थोरात, योगेश वाघ, प्रवीण औटी, संजय पोळ, दादासाहेब शेटे, धीरज औटी, सौरभ गंधाडे ,युवराज दिवटें उपस्थित होते.

भुरट्या चोरांकडून चोरीचा प्रकार : पाेलिसांचा अंदाज
श्रीनागेश्वर मंदिरातील चोरीमध्ये सराईत गुन्हेगारांचा समावेश नसावा. नशेच्या आहारी गेलेल्या भुरट्या चोरांकडून चोरीचा प्रकार घडला असावा.तपासासाठी पारनेर पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. चोरी संदर्भात ग्रामस्थांना काही माहिती असल्यास,संशय असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...