आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे चांगली झाली असेल तर चौकशीला का घाबरता ?:राम शिंदेंचा रोहित पवारांना सवाल; कामातील 20 कोटींचे अपहार प्रकरण

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील पानंद रस्ते योजनेतून झालेल्या कामातील 20 कोटींच्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी चौकशीचे आदेश दिले. या मतदारसंघांमध्ये शिंदे विरुद्ध पवार संघर्ष पेटला आहे. सोमवारी (29 ऑगस्ट) आमदार प्रा. राम शिंदे यांनी पानंद रस्ते योजनेतून कामे चांगली झाली असतील तर चौकशीसाठी का घाबरतात असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांना केला.

चौकशी सूडबुद्धीने नाही

राम शिंदे म्हणाले, निविदा न काढता कंत्राटदाराला धनादेश देण्याचा प्रकार मी कधी आतापर्यंत पाहिला नाही. या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे. सूडबुद्धीने चौकशी करण्याचे काही कारणच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कामांच्या चौकशींचे आदेश

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पत्रकारांशी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ व नियोजन चे खाते असल्यामुळे व रोजगार हमी योजनेचे खाते संदिपान भूमरे यांच्याकडे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. चौकशी कुठल्याही सूडबुद्धीने करण्याचे काहीच कारण नाही. गावोगावी लोक तक्रारी करत आहेत.

मग घाबरता कशाला?

ग्रामपंचायत इना विश्वासात न घेता कामे केली गेली. ग्रामपंचायत ने आराखडा एक दिला मंजूर दुसरा झाला आणि तिसऱ्या ठिकाणी कामे झाली. जे ही कामे झाली ती लोकांच्या उपयोगाची नाहीत. असे शिंदे यांनी सांगितले. समाज माध्यमावर तुम्ही काहीही दावा करू शकता. कामे चांगली झाली असेल तर तपासून घेऊ द्या. घाबरता कशाला असा उलट सवाल शिंदे यांनी रोहित पवारांना केला.

20 कोटीचा भ्रष्टाचार झाला

राम शिंदे म्हणाले, निविदा न करता कंत्राटदाराला धनादेश दिल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. असे शिंदे यांनी यावेळी सांगितल. पानंद रस्त्यात 20 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल.

ईडीनंतर दुसरी चौकशी

रोहित पवार यांची अगोदरच एक ईडी मार्फत चौकशी सुरू होती. ही चौकशी दुसरी आहे. ईडी ही त्रयस्थ संस्था असून, या संस्थेवर केंद्राचा व राज्याचा कुठलाही दबाव नसतो. सूडबुद्धीने नव्हे तर अभ्यासाअंती ईडीने ही चौकशी सुरू केली असेल.

बातम्या आणखी आहेत...