आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव जिहादबाबत जागृती:हिंदुत्वाच्या ‘पॅरामीटर’मध्ये बसणारा उमेदवार नसल्यास निवडणूक लढणार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक पातळीवर पालिका व विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी त्यांची हिंदुत्वाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. आमच्या हिंदुत्वाच्या पॅरामीटरमध्ये बसणारा योग्य उमेदवार नसल्यास राजकीय हस्तक्षेप करणार व निवडणुकाही लढणार, अशा शब्दात हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी आगामी निवडणुकांमध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत.

नगर येथे आयोजित मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगरमध्ये एकेकाळी स्व.अनिल राठोड हे शिवसेनेचे सलग २५ वर्षे आमदार होते. मात्र, शिवसेनेची हिंदुत्वाबाबतची भूमिका डळमळीत झाल्यानंतर नगरमध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सध्याच्या सरकारकडून सुरू असलेले काम आम्हाला आश्वस्त करणारे आहे. त्यामुळे केंद्रात आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शहा व योगी आदित्यनाथ हवे आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवे आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरच्या विषयांसाठी, येथे होणारी अतिक्रमणे थोपवण्यासाठी स्थानिक पातळीवरही तसेच हिंदुत्ववादी नेतृत्व हवे आहे. आगामी पालिका व विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर उमेदवारांनी आधी हिंदुत्व बाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते आमच्या पॅरामीटरमध्ये बसत नसतील, अपेक्षित उमेदवार मिळत नसेल, तर हिंदू राष्ट्र सेना राजकीय हस्तक्षेप करेल व निवडणूकही लढेल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

नगर जिल्ह्यात लव जिहादच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. किशोरवयीन अवस्थेतील मुली, युवतींमध्येही याबाबत जनजागृतीसाठी नगरमध्ये मेळावे घेतले जाणार आहेत. येत्या काळात हिंदू राष्ट्र सेना अधिक सक्षमपणे काम करताना दिसेल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...