आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकिंग क्षेत्रात पारदर्शकता महत्वाची असते. योग्य शिस्त असेल, तरच कारभार चालतो. सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचा मागील २२ वर्षांचा प्रवास ठेवीदार, कर्जदारांसाठी मोठं बळ देणारा आहे. स्व. गुंदेचा यांनी बँकिंगच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभं केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात नगर शहराच्या दौऱ्यावर आले असताना, त्यांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मागील महिन्यात या वास्तूचे लोकार्पण सहकारमंत्री अतुल सावे, आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले होते. त्यावेळी तब्येतीच्या कारणास्तव आ. थोरात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे शहरात आल्यानंतर त्यांनी नूतन विस्तारित इमारतीची पाहणी करीत शुभेच्छा दिल्या. या वेळी आ. लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, संचालक मनोज गुंदेचा, चेअरमन किरण शिंगी, व्हाईस चेअरमन विनय भांड, संचालक शांतीलाल गुगळे, सीए विशाल गांधी, सीए संकेत पोखरणा, प्रमोद डागा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे, शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, आकाश आल्हाट आदी उपस्थित होता. आ. थोरात म्हणाले, की स्व. सुवालालजी यांनी सेवा म्हणून बँकिंग क्षेत्रात काम केलं. ठेवीदारांचा पैसा हा आपला पैसा असून, त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपली असल्याच्या भावनेतून काम केलं.
आज सहकारी क्षेत्रातील अनेक बँकांची दुरवस्था काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, ही पतसंस्था याला अपवाद आहे. मनोज गुंदेचा त्यांचा वारसा समर्थपणे चालवत असून, त्यांनीही कामकाजात पाळलेली पारदर्शकता, शिस्तीमुळे सभासदांचा पतसंस्थेवर मोठा विश्वास आहे. त्यामुळेच मोठ्या रकमेच्या ठेवी आज पतसंस्थेकडे आहेत. मनोज गुंदेचा यांनी नवीन इमारतीची माहिती आ. थोरात यांना दिली. ते म्हणाले की, स्व. सुवालालजी आणि आ. थोरात यांच्यात दृढ व्यक्तिगत ऋणानुबंध होता. त्यामुळे नेहमी गुंदेचा परिवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे काम त्यांनी केले आहे. पतसंस्थेच्या सभासदांचा विश्वास कायम टिकवून ठेवणे ही आमची जबाबदारी असून याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.