आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार प्रकरणाची चौकशी:कामे चांगली झाली असतील तर चौकशीला का घाबरता; आमदार प्रा. राम शिंदे यांचा आमदार रोहित पवारांना सवाल

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तथा कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील पाणंद रस्ते योजनेतून झालेल्या कामातील २० कोटींच्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर या मतदारसंघात शिंदे विरुद्ध पवार संघर्ष पेटला आहे. सोमवारी (२९ ऑगस्ट) आमदार प्रा. राम शिंदे यांनी पाणंद रस्ते योजनेतून कामे चांगली झाली असतील तर चौकशीसाठी का घाबरतात असा सवाल थेट आमदार रोहित पवार यांना करून या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे. निविदा न काढता धनादेश देण्याचा प्रकार मी कधी आतापर्यंत पाहिला नाही. या प्रकरणाची सूडबुद्धीने चौकशी करण्याचे काही कारणच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पानंद रस्ते योजना व रोजगार हमी योजनेंतर्गत पानंद रस्ते कामात कर्जत - जामखेड तालुक्यात २० कोटी रूपयांचा अपहार झाला असून,याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी चार सदस्यीय समिती मार्फत सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विरुद्ध भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पत्रकारांशी बोलताना आमदार प्रा. शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ व नियोजन चे खाते असल्यामुळे व रोजगार हमी योजनेचे खाते संदिपान भूमरे यांच्याकडे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुठल्याही सूडबुद्धीने करण्याचे काहीच कारण नाही. गावोगावी लोक तक्रारी करत आहेत. ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता कामे केली गेली. ग्रामपंचायतने आराखडा एक दिला मंजूर दुसरा झाला, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...