आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी:उद्धव ठाकरे एनडीएमध्ये पुन्हा आल्यास त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करू : आठवले

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी पित नाही बिडी त्यामुळे माझ्या मागे नाही ईडी

महाविकास आघाडीत मतभेद आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही. उद्धव ठाकरे जर पुन्हा एनडीएत आले तर त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत सांगितले. उद्धव ठाकरे जास्त दिवस महाविकास आघाडीसोबत राहिल्यास शिवसेनेतही फूट पडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मी शिर्डीमध्ये पुन्हा येईल असे म्हणत आठवले यांनी भविष्यात पुन्हा शिर्डी लोकसभा लढण्याचे संकेत दिले. शिर्डीत रिपाइंच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी ते बोलत होते.

मी पित नाही बिडी त्यामुळे माझ्या मागे नाही ईडी
ईडीची नोटीस आल्यानंतर खासदार राऊत यांनी ‘आ देखे जरा किसमे कितना दम, असे ट्विट केले होते. यावर ‘हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम, अशा शायरी अंदाजात आठवले यांनी राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले. मी पित नाही बिडी त्यामुळे माझ्या मागे नाही ईडी, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. ईडीची नोटीस आणि सरकारचा कोणताही संबंध नाही. ईडी कोणावरही मुद्दाम कारवाई करत नाही. ज्या ठिकाणी अनियमितता तेथे कारवाई होते, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. दरम्यान यावरही राजकारण होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...