आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करतात. त्या दिशेने जे विद्यार्थी मार्गक्रमण करतात ते पुढे जातात. इतरांची मात्र दशा होते, असे प्रतिपादन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले.
श्रीरामपूर पंचायत समिती शिक्षण विभाग व श्रीरामपूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर शिक्षण संस्थेच्या जेटीएस विद्या संकुलात इयत्ता १० व १२ वित प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच सेवानिवृत्त व नवनियुक्त मुख्याध्यापक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, नवनाथ कुताळ उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जाकीर सय्यद, राजकुमार तांबे, दिलीप नाईक, सुनील म्हसे,जयश्री उंडे, रविंद्र औताडे, सोपान मगर, गंगाधर नाईक, संजय शेळके, दत्तात्रय पाचपिंड, भावना ढोरे,सुमती औताडे,दत्तात्रय कांबळे, प्राचार्य श्रीराम कुंभार, उपमुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी, वर्षा दातीर, शाहीन शेख, संजय फापाळे, इरफान शेख,गणेश बाचकर आदी उपस्थित होते. कुताळ म्हणाले, फक्त पुस्तक डोक्यात घालणे म्हणजे शिक्षण नसते, त्या पलीकडे जाऊन आजच्या पिढीला शिक्षण दिले तरच गुरू शिष्य,मूल आणि आई वडील यांच्या नात्यात आदर राहील.
सामलेटी म्हणाल्या, अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी असतानाही शिक्षक अतिरिक्त कार्यभार सांभाळून काम करतात ही अभिमानाची बाब आहे. प्रास्तविक सुनील म्हसे यांनी, सूत्रसंचालन प्रा. विकास बनकर यांनी, तर आभार राजकुमार तांबे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.