आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराध्येय गाठण्याची जिद्द असल्यास गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:त आत्मविश्वास असण्याची गरज आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जीवनातील ध्येय गाठण्याची गरज आहे. शिक्षणानेच परिस्थिती बदलण्याची शक्ती असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना ध्येय ठरवावे, असे आवाहन सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्ष जागृती ओबेरॉय यांनी केले. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने लालटाकी, भारस्कर कॉलनी येथील स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन मधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टेबल व बसण्यासाठी सतरंज्या भेट देण्यात आल्या.
त्यावेळी त्या बाेलत होत्या. यावेळी निशा धुप्पड, डॉ. सिमरन वधवा, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, गीता नय्यर, विणा ओबेरॉय, डॉ. सोनाली वहाडणे, बालभवनच्या समन्वयक रुबिना शेख, सुनीता सोळसकर, संतोष बेदरकर आदी उपस्थित होते. डॉ. सिमरन वधवा यांनी प्रेरणादायी कथेतून यशाचे गुपित विद्यार्थ्यांसमोर उलगडले, तर स्वतःमधील क्षमता ओळखण्याचे आवाहन केले. प्रत्येकात वेगवेगळ्या क्षमता आहे. त्या क्षमता ओळखल्यास यश मिळवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवाप्रीतच्या महिलांनी बालभवन मधील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे व चॉकलेटचे वाटप करुन त्यांच्याशी संवाद साधला. या उपक्रमासाठी सेवाप्रीतच्या सदस्या नताशा धुप्पड, गीता धुप्पड, विणा ओबेरॉय, विणा खुराणा, रिटा बक्षी, अर्चना ओबेरॉय, डॉ. सोनाली वहाडणे, अंशू कंत्रोड, रविंदर धुप्पड, संगीता अॅबट, दिशा ओबेरॉय यांचे सहकार्य लाभले. बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल रुबिना शेख यांनी आभार मानले.
गरजू घटकांना शिक्षणासाठी आधार
गरजू घटकातील विद्यार्थी हे समाजातील घटक आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी सेवाप्रीत गरजू घटकांना शिक्षणासाठी आधार देत आहेत, असे ग्रुप लीडर निशा धुप्पड यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.