आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे:शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण थांबवा; अण्णा हजारे यांचे आवाहन

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - निसर्गाचे शोषण करून तुम्ही विकास करणार असेल तर तो शाश्वत विकास होणार नाही. कधीतरी त्याचा विनाश हा होणारच. शाश्वत विकास करायचं असेल निसर्गाचं शोषण थांबवावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे तीन दिवसीय "सहावे" वार्षिक संमेलन शिर्डी येथे आयोजित केले होते. हजारे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक होते. प्रकृती ठीक नसल्याने हजारे यांच्या अनुपस्थितीत हे संमेलन पार पडले.

हजारे यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेण्यासाठी राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात हजारे यांना "सन्मानचिन्ह" वनश्री विशेषांक देवून मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे,कार्याध्यक्ष प्रमोद काकडे , राज्य प्रमुख संघटक व राज्य आदर्श शिक्षक श्अनिल लोखंडे यांनी सन्मान केला. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश केदारी, नगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ , राज्य कार्यकारिणी सदस्य दिलीप धावणे पाटील, शिवाजी झावरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विजय बोडखे , जिल्हा कार्यकारिणी सदस्य अर्जुन राऊत, दिव्य मराठीचे प्रतिनिधी सुभाष कोंडेकर, मुख्याध्यापक सुभाष वाखारे आदि यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, पर्यावरण हा केवळ शिर्डी, राळेगसिद्धी पुरता मर्यादित राहिलेला नाही. तो जागतिक प्रश्न निर्माण झाला आहे. जगातील मोठमोठे शास्त्राज्ञ देखील चिंताग्रस्त आहेत. निसर्गाचं शोषण करून तर तो शास्वत विकास होणार नाही कधी तरी तो विनाश हा होणारच शाश्वत विकास करायचं असेल तर जागतिक पातळीवर पर्यावरणा संदर्भात सामाजिक संघटनांनी निसर्ग प्रेमी संघटनांनी यात पुढाकार घेण्याची गरज आहे.

पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व शोषण थांबले पाहीजे कारण ते अतिशय भयानक आहे त्याचा दुष्परिणाम म्हणूनच दिवसेंदिवस समुद्राची जलपातळी वाढत आहे, ओझोन पातळी कमी होत आहे ,त्याचे मानवी जीवनावर घातक दुष्परिणाम होत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केल्याशिवाय पर्याय नाही . आण्णांनी मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...