आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जिल्ह्यात 35 लाखांची अवैध दारू जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 20 दिवसात 101 आरोपींना अटक

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात केलेल्या कारवाईत ३५ लाख १३ हजार २७५ रूपयांचा अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त करण्याबरोबरच अवैध मद्यावर कारवाई करून ११७ गुन्हे दाखल करत १०१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

जामखेड येथील राजेवाडी फाटा बस स्थानकासमोर २० डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कार्यवाहीत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा व १ वाहनांसह ६ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अप्पासाहेब महादेव कुमटकर यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. यात देशी-विदेशी मद्य व ११ वाहनांसह २८ लाख ८३ हजार २७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त अनिल चासकर व नगर अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जी.टी.खोडे, दुय्यम निरीक्षक डी.आर.ठोकळ, आर.पी.दांगट, टी.बी.करंजुले, पी.डी.गदादे, ए.ए.कांबळे, डी.ए.खैरे, एस.ए.पवार व सुनंदा अकोलकर यांनी ही कारवाई केली.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचे नियोजन नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यार्क, हात्तभट्टी दारु, ताडीच्या निर्मिती व विक्रीवर कारवाईसाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्यास याची माहिती उत्पादन शुल्क विभागास द्यावी, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...