आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक, तीन ट्रक, चार टेम्पो पकडले; 43 लाखांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी शहरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव-पाथर्डी शहरासह तालुक्यात वनविभागाने कारवाई करत अवैधरित्या वृक्षतोड करून चालवलेल्या तीन ट्रक,चार टेम्पो तसेच वृक्ष तोडण्याचे इतर साहित्य जप्त करून कारवाई केली. यात सुमारे ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अवैधरित्या झाडाची कत्तल केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांना मिळाली होती. त्यांनी तीन पथके तयार करून रात्र गस्त घातली. दोन्ही तालुक्याच्या विविध भागातून छापे टाकत ही कारवाई केली. यात पथकाने चार टेम्पो,तीन ट्रक, लाकडाचे तुकडे,इलेक्ट्रिक कटर, तीन जनरेटर व कुऱ्हाडी,लाकूड कापण्याची करवत हे साहित्य जप्त केले. वनपरिक्षेत्र अधिकारी साबळे,वनपाल राजेंद्र आल्हाट, रामदास शिरसाठ, विजय पालवे, आप्पा घनवट, पांडुरंग हंडाळ, सुधाकर घोडके, वर्षा गीते, मनिषा शिरसाठ, सविता रायकर, नारायण दराडे, नौशाद पठाण, स्वाती ढोले यांनी केली.