आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैध वाळू वाहून नेणारा पोलिसांच्या ताब्यात

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शब्बीर बादशाह शेख (वय ३२ रा. लाडजळगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्याचे नाव आहे.

त्याच्याकडून ६० हजार रूपयांची सहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव-गेवराई रोडवर सुकळी फाटा येथे बुधवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून शेख विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शेवगाव पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...