आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 लाखांचा मुद्देमाल जप्त:अवैध वाळू उत्खनन करणारा जेसीबी; डंपरसह आरोपी जेरबंद

शेवगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खरडगाव येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असताना पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत मध्ये जेसीबी यंत्र, डंपरसह २६ लाखांचा मुद्देमालासह ,दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.खरडगाव येथील नानी नदीपात्रातून काही लोक चोरुन वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करुन या ठिकाणी जाऊन छापा घालण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतूक करताना मिळून आल्याने अश्पाक सुलेमान शेख, गणेश चंद्रकांत केदार यांना ताब्यात घेत, त्यांच्या ताब्यातील पिवळ्या रंगाचा एक जेसीबी अंदाजे किमत २० लाख रुपये, एक आकाशी रंगाचा डंपर व तीन ब्रास वाळू असा ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी सचिन काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस स्टेशन मध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहायक निरिक्षक भाटेवाल, पोलिस कर्मचारी सुरेश औटी, नितीन शिरसाठ, नितीन चव्हाण, सचिन काकडे, विलास उकीर्डे आदीनी केली आहे. या कारवाईचे तालुक्यात स्वागत करण्यात आले, तर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बातम्या आणखी आहेत...