आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरणाच्या विनाशाचा विचार न करता बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत वाळू उपसा सुरु आहे. म्हसे, वडगाव शिंदोडी येथे घोड धरणातून लिलावाविना लपून छपून यांत्रिक बोटीच्या साहाय्याने पाच ते सहा डंपरद्वारे, ट्रकद्वारे अवैध वाळूचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कारवाईचे आदेश देऊनही हा उपसा सुरूच आहे. त्यामुळे पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या धंद्याला वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा आहे.
पर्यावरणाच्या विनाशाकडे डोळेझाक केल्याने संपूर्ण जगाला समस्येला सामोरे जावे लागते. भारतातही निसर्गाचा समतोल ढासळत अाहे. मात्र या गंभीर समस्येकडे महसूल विभागाचे अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होणे, हे दुर्दैव आहे. या वाळूमाफियांकडून पोलिसांना व महसूल अधिकारी यांना वाळूमाफियांकडून रेट कार्ड ठरवून दिले आहे. डंपरमागे ट्रक, ट्रॅक्टर दरमहा हप्ता दिला जात असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
श्रीगोंदे तहसील कार्यालयात गौण खनिज विभाग आहे. मात्र तालुक्याच्या विविध भागांत वाळूचा प्रचंड उपसा होत असताना या विभागाकडून धडाकेबाज कारवाईची अपेक्षा असूनही हा विभाग निष्क्रिय झाला आहे. अशातच वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक कारवाई करत नाही.
महसूलमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली
पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वाळूचा एकही कण अनधिकृतपणे उपसा झाला नाही पाहिजे असे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. तरीही बेलवंडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वडगाव शिंदोडी येथे घोड नदी पात्रात राजरोसपणे वाळू उपसा होत असल्याचे दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.