आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • I'm Sure Of The Word, You Get To Work; Suggestions To Deputy Chief Minister Pawar's Activists, Unveiling Of Full Size Statue Of Shankarrao Kale | Marathi News

लोकार्पण:मी शब्दाला पक्का आहे, तुम्ही कामाला लागा; उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना,  शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये कार्यकत्यांनी जनतेशी प्रतारणा न करता त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकांना सामोरे जावे. मी शब्दाला पक्का आहे, मी जर कामे केली नाहीत, तर पवारांची औलाद नाही. आम्ही निवडणुकीत लाखांनी निवडून येतो, परंतु तुम्ही आशुतोषला केवळ आठशे मतांनी निवडून आणले, असे पुढे होता कामा नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

कोपरगाव पंचायत समितीच्या आवारात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण तसेच बसस्थानक, पोलिस ठाणे इमारतींच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे, ग्रामविकास मंत्री व नगर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, जि. प. अध्यक्ष राजश्री घुले, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मीनाताई जगधने, खासदार सुजय विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, विभागीय आयुक्त गमे, जिल्हाधिकारी भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, स्नेहलता शिंदे, पुष्पाताई काळे, चैताली काळे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, दोन वर्ष कोरोनामुळे संपूर्ण जगात अर्थव्यवस्था ढासळली. अर्थव्यवस्थेला फटका बसला, लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळेच अर्थसंकल्पात कुठलाही टॅक्स वाढवला नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम आखला आहे. मी शब्दाला पक्का आहे, वचनपूर्ती करणारे शरद पवार यांचे आपण कार्यकर्ते आहोत. शब्द दिला तो खरा केला. कोपरगावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हाती घेतलेली कामे आशुतोष काळे पूर्ण करतील, विकासाचा गाडा असाच धावत जावू दे, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. आशुतोष काळे यांनी प्रास्तविक व स्वागत केले. स्नेहलता शिंदे यांनी आभार मानले.

कोपरगाव येथील बसस्थानक, पोलिस ठाणे इमारतींचेही करण्यात आले उद्घाटन

काळे यांनी कर्मवीर भाऊरावांचा वारसा जपला
शंकरराव काळे यांनी राज्याच्या विकासासाठी वाहुन घेतले. आम्ही राज्यात कितीही गप्पा मारीत असलो, तरी आम्ही आमचे मतदार संघ सोडून जात नाही. मी व वळसे यांनी बारामती व आंबेगाव मतदारसंघ सोडला नाही. स्वत:चा परिसर सोडून पारनेरला जायचं व दोनदा निवडून यायचं हे कसब काळे यांच्याकडेच होते. कोपरगाव व पारनेर मतदार संघ त्यांनी जिंकला, त्यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी कर्मवीर भाऊरावांच्या विचारांचा वारसा जपला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राज्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र
आज राज्यात काही लोक अचानक बाहेर आले व अचानक भोंगे बंद करण्याची भाषा करू लागलेत. इतक्या दिवस काय झोपा काढल्या होत्या का? बोलणाऱ्यांपैकी मागच्या सरकारमध्ये नव्हते का? समाजामध्ये वितुष्ट व विद्वेष निर्माण होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही वेगवेगळ्या विचारसरणीची माणसे आहेत, परंतु राज्याचे भले करण्यासाठी एकत्र आलो आहोत. श्रीलंका व युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...