आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:मोहरम मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा : जावळे

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहरम मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. मिरवणूक मार्गावरील इतर उपाययोजना, विद्युत व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

विविध संघटना, नगरसेवकांकडून मोहरम उत्सवाच्या पार्श्भूमीवर उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांना निवेदने दिली आहेत. पोलिस प्रशासनाकडूनही मिरवणूक मार्गावरील आठवडे बाजार बंद करणे, मिरवणूक मार्गावर विद्युत व्यवस्था करणे, खड्डे बुजवणे, धोकादायक इमारती उतरवून घेणे, ध्वनी प्रदुषण मोजणीसाठी पंच नेमणे, धार्मिक स्थळे झाकणे, संरक्षित करणे, बॅरिकेटिंग करणे, राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर, वाढदिवसाचे फलक काढणे, मोकाट कुत्री व जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.

या पार्श्वभुमीवर आयुक्त जावळे यांनी बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मार्गावरील कचरा, माती उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू होईल, असे आयुक्त जावळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...