आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदंड प्रतिसाद:बियायुक्त गणपतीचे परसबागेत विसर्जन

सोनई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा गणपती उत्सव पर्यावरण स्नेही पद्धतीने साजरा करू व त्यासाठी मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा नेहल प्रशांत गडाख यांनी सोनईत आयोजित केली होती त्यासही उदंड प्रतिसाद लाभला. नेवासे तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी व तरुणांनी घरी मातीच्या गणपतीची स्थापना केली होती. शुक्रवारी माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी मंत्री शंकरराव गडाख, गडाख कुटुंबियांच्या निवासस्थानी बसवण्यात आलेल्या बियायुक्त मातीच्या गणपतीचे परसबागेत खड्डे करून त्यात पाणी सोडून पूजन करून बियायुक्त गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

या बियातून तयार होणाऱ्या वृक्षांचे वर्षभर पाणी घालूंन योग्य ती निगराणी करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार गडाख, शारदाताई गडाख, विजय गडाख, माजी सभापती सुनीता गडाख, युवा नेते उदयन गडाख, नेहल प्रशांत गडाख, साक्षी सुनील गडाख, यश गडाख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...