आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:भिंगार येथील विसर्जन मिरवणूक उत्साहात

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. पहिल्या मानाच्या देशमुख गणपतीची पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते उत्थापन पूजा झाल्यानंतर ब्राह्मण गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शुक्लेश्र्वर मंदिराजवळ मानाच्या गणपतींची मिरवणूक पोहचली. तसेच शहरातील इतर चौदा गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.

रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटात गणरायाला निरोप दिला. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बंदोबस्ताचे आदेश दिले होते. उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...