आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडगा:विसर्जन मिरवणूक; चिठ्ठया टाकून गणेश मंडळांना नंबर

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहर शिवसेनेच्या मंडळावर दोन्ही गटांनी केलेला दावा व त्यावरून निर्माण झालेल्या नंबरच्या वादावर पोलिसांनी चिट्ठी टाकून नंबर निश्चित करण्याचा तोडगा काढला आहे. बुधवारी सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात चिठ्ठी काढून नंबर निश्चित केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली.

शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश देवस्थानचा गणपती पहिल्या क्रमांकावर असतो. त्यानंतर इतर मानाचे ११ गणपती रांगेत असतात. त्यानंतर तेराव्या क्रमांकावर जय आनंद महावीर युवक मंडळ, चौदाव्या क्रमांकावर नगर शहर शिवसेना व पंधराव्या क्रमांकावर दोस्ती गणेश मंडळ असते. शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर या दोन्ही गटांनी चौदाव्या क्रमांकावरील मंडळावर दावा ठोकला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी आता चिठ्ठी काढून मंडळाचे नंबर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता कोतवाली ठाण्यात विशाल गणेश देवस्थानचा गणपती वगळता इतर पंधरा मंडळाच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. निघालेल्या चिट्ठीनुसार या मंडळांना २ ते १६ असे क्रमांक देण्यात येणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...