आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यायी मार्ग:इम्पिरियल-सक्कर चौक रस्त्यावरील वाहतूक वळवली ; शहरातून सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीला बंदी

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे शहरातील इम्पिरियल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. १७ जूनपासून ३० जूनपर्यंत ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. या काळात सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरील बायपासमार्गे वळवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत. पुण्याकडून औरंगाबादकडे जाणारी वाहतूक सक्कर चौक-टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड-स्वस्तिक चौकमार्गे वळवण्यात आली आहे. नेप्ती नाका-टिळक रोडने पुणे व औरंगाबादकडे जाणारी वाहतूक नेप्ती नाका-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड-स्वस्तिक चौकमार्गे वळवली आहे. रेल्वे स्टेशनकडून औरंगाबादकडे जाणारी वाहतूक सक्कर चौक-टिळक रोड-आयुर्वेद कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड-स्वस्तिक चौकमार्गे औरंगाबादकडे जाईल. तर पुण्याकडे जाणारी वाहतूक रेल्वे स्टेशन-कायनेटीक चौक मार्गे वळवली आहे. औरंगाबादकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक इम्पिरियल चौक-चाणक्य चौक-आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड-सक्कर चौकमार्गे जाईल. पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस स्वस्त‍िक चौक-चाणक्य चौक- आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड-सक्कर चौकमार्गे जातील. ज्या वाहनचालकांना सक्कर चौक येथून रेल्वे स्टेशनकडे जायचे, त्यांनी कायनेटीक चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, असे सांगितले आहे. सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरील बायपासमार्गे वळविण्यात यावी. रेल्वे स्टेशन येथील मालधक्‍यावरील वाहने, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने व शासकीय अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही. त्यांची वाहतूक यापूर्वी लागू असलेल्या आदेशाप्रमाणे सुरू राहिल. मात्र, हे काम पूर्ण होईपर्यंत मालाची वाहतूक करण्यासाठी जास्तीत जास्त हलक्या वाहनांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...