आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संस्कृती:‘आयुर्वेदिक शास्त्राला भारतीय संस्कृतीत महत्त्व’ ; तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीत आयुर्वेदिक शास्त्राला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदामुळे मनुष्याचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते आयुर्वेद शास्त्राचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होणे गरजेचा आहे. नगर शहर व जिल्हाभरातील नागरिकांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिक आयुर्वेदाकडे वळत आहेत, असे प्रतिपादन राजेंद्र बेंद्रे यांनी केले.

केमिस्ट परिवारातर्फे आयुर्वेद रिसेलर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या संचालकपदी सुधाकर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी, सुधीर लांडगे, आनंद बोरा, फारुक शेख, नगरसेवक विपुल शेटिया, मिलिंद शिरसागर, विनय शहा, अशोक बलदोटा, शरद डोंगरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...