आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू संस्कृतीत अन्नदानाला मोठे महत्त्व आहे. विविध प्रकारचे दान लोक करतात, पण अन्नदान हे श्रेष्ठ दान असून, यामुळे भुकेलेल्यांना अन्न मिळते, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.नेप्ती (ता. नगर) येथील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वेताळबाबा महाराजांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार लंके यांनी भेट देऊन वेताळबाबा महाराजांची पूजा केली. त्यावेळी ते बोलत होते.
भंडाऱ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री वेताळ बाबा मित्र मंडळ, समता परिषद व द किंग ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. भंडाऱ्यानिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांना सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करुन परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. समता परिषदेचे अध्यक्ष शाहूराजे होले यांच्या हस्ते वेताळ बाबा महाराजाचा अभिषेक घालण्यात आला. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
रात्री भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनात ग्रामस्थ तल्लीन झाले होते. गवळण व भक्ती गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, अनुराग आगरकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, माजी संचालक वसंत पवार, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच जालिंदर शिंदे, शिवाजी होळकर, बाबासाहेब जाधव, प्रा. भाऊसाहेब पुंड, भानुदास फुले, हरिभाऊ पुंड ,तुषार भुजबळ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.