आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशुद्ध पाणी:रेल्वे स्टेशन परिसरात मिळतेय पिण्यासाठी अशुद्ध पाणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रेल्वे स्टेशन भागात नळाद्वारे येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून, हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे यांनी मनपावर आरोप केला आहे.

रोकडे यांनी फर्मच्या नावाने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्याकडे २२ सप्टेंबरला नळद्वारे आलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिले होते. या अहवालाने जलशुध्दीकरणाचे पितळ उघडे पडले, असा आरोप त्यांनी केला आहे. या भागात दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडत असताना, विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून, त्यांना उलट्या व जुलाबचा त्रास सुरु झाला आहे. नळाद्वारे येणारे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही? हे पडताळणीसाठी रोकडे यांनी पाण्याचे नमुने तपासणीला दिल्याने ही बाब उघड झाली आहे.

पिण्यायोग्य पाणी पुरवावे
महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. सर्वत्र नागरीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. महापालिका नागरिकांकडून विविध कर गोळा करत असून, पाणीपट्टी न भरल्यास नळ कनेक्शन कट केले जाते. मात्र कर भरुन देखील नागरिकांना पिण्यायोग्य शुध्द पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन किमान पिण्या योग्य पाणी पुरवावे.'' सोमनाथ रोकडे, उपाध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...