आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यात ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत नव्याने ३ हजार ६३ जनावरांना लंबीची बाधा झाली असून 192 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लंबी चा फायदा व रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असून बाधित होणाऱ्या जनावरांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यापार्श्वभूमीवर स्वच्छ गोठा व औषध फवारणीची उपाय योजना हाती घेण्यात आली आहे.
एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना तसेच माशा व कीटकांमुळे लंपी रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. प्रशासनाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांच्या स्थलांतरावर निर्बंध आणून, बाजार बंद केले आहेत. तसेच लसीकरणालाही गती देण्यात आली. तथापि, लंपी नियंत्रणात येत नसल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने गोठे स्वच्छ करण्यासह डास नियंत्रणासाठी उपाय योजना राबवण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ६६३ जनावरांना लंपीची बाधा झाली. जिल्ह्यात ३ नोव्हेंबरला बाधित जनावरांचा २० हजार १५६ होता, तो सोमवारी ७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६६३ वर पोहोचला आहे. मृत जनावरांचा आकडा ३ नोव्हेंबरला १ हजार २८३ होता, तो वाढून १ हजार ३६३ वर पोहोचला आहे. चार दिवसांत तब्बल १९२ जनावरांचा मृत्यू व तीन हजाराने बाधीत जनावरांची वाढलेली संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन वाचवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
१३ हजार ५२१ जनावरे उपचारानंतर बरी पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाय योजना व तत्काळ उपचार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तब्बल १३ हजार ५२१ जनावरे बाधा होऊनही उपचारानंतर बरी झाली आहेत. लक्षणे आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
काय उपाय योजना करणार ? जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जर गोठ्यात जनावराला लंपीची बाधा झाली असेल तर तेथे औषध फवारणी केली जाणार आहे. या माध्यमातून डास निर्मुलन करून रोगाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचीही मदत घेतली जाणार आहे.
पाऊस थांबल्याने लम्पी आजार नियंत्रणात येईल पाऊस लांबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असल्याने, लम्पीचा फैलाव होत आहे. परंतु, पाऊस थांबल्यामुळे लम्पी नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे. डास नियंत्रणासाठी गोठ्यांमध्ये फवारणी केली जाईल.'' डॉ. अशोक ठवाळ, पशुधन विकास अधिकारी, नगर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.