आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन विशेष:अहमदनगरच्या 11 हजार जणांनी नाकारले छापील वीजबिल, ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पावलाला अहमदनगर मंडळातील 11 हजार 112 पर्यावरण स्नेही ग्राहकांनी साथ देत छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर बंद करून ऑनलाईन सेवेच्या पर्यायाचा वापर करीत महावितरणच्या गो - ग्रीन सेवेचा लाभ घेतला. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामागे 10 रुपयाची सुट देण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 11 हजार 112 वीज ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महा विज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर चालू वीजबिल यासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्याचे वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते कधीही डाउनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे. महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल अँपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी. याबाबतची अधिक www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

वीज बिलात वार्षिक 120 रुपयांची होणार बचत

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. यात वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रति बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...