आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची मदत:कोरोनामुळे मृत पावलेल्या 11 हजार 317 जणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50  हजारांची अनुदान मंजूर

अहमदनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 11 हजार 317 मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 हजार रुपये आतापर्यंत राज्य सरकारने मंजूर केले आहेत. त्यातील अपवाद काही वगळता बहुतांशी नातेवाइकांच्या बँक खात्यात 50 हजारांची रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख डॉ.वीरेंद्र बडधे यांनी सोमवारी (20 जून) ला दिली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 16 हजार 515 अर्ज कोरोना मृतांच्या नातेवाईकांचे आले होते. त्यापैकी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कागदपत्रांची तपासणी करून पुढच्या प्रक्रियेसाठी अर्ज राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडे पाठवले होते. 11 हजार 365 अर्जांना शासनाने मंजुरी दिली असून, 11 हजार 317 मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत मंजूर केली आहे. त्यातील बहुतेक नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात ही मदत जमा झाली आहे.असे डॉ. वीरेंद्र बडधे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...