आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • In Ahmednagar On The Day Of Teacher's Day Itself, Protest Of Teachers Pending Various Demands In Front Of The Collector's Office On Behalf Of Teachers' Union.

शिक्षक दिनीच शिक्षकांची निदर्शने:प्रलंबित विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनाच्या दिवशी सोमवारी (5 सप्टेंबर) ला विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमनर यांना विविध मागण्याबाबत निवेदन दिले.अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर हे आंदोलन करण्यात आले.

शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ टकले,सचिव सोपान कदम, प्रा. अश्रुबा फुंदे पुणे विभागिय अध्यक्ष,प्रा. भास्करराव जऱ्हाड सल्लागार , प्रा. सतीश शिर्के, प्रा.अल.धे,प्रा.एस.बी., प्रा. एम. के शेख, प्रा. गणपतराव नवले, प्रा.अ.न.हुंडेकरी, प्रा. संजय साठे, प्रा. रवी देवढे आदी यावेळी उपस्थित होते.

मूल्यांकन पात्र घोषित कनिष्ठ महाविद्यालय व तुकड्यांना प्रचलित निकषानुसार तातडीने व रोखीने अनुदान देण्यात यावे, वाढीव पदांना नियुक्ती तारखेपासून मान्यता व वेतन देण्यात यावे, दहा, वीस ,तीस वर्षाच्या सेवेनंतरही आश्वासित प्रगती योजना कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना लागू करण्यात यावी, आयटी माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना अनुदान व वेतन देण्यात यावे,1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या व नतंर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमनर यांना देण्यात आले.

रिक्त पदासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवा

रिक्त पदासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, एनपीएसमध्ये शिक्षकांना ऐच्छिक कपातीची परवानगी देण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्या मधील विद्यार्थी संख्या शाळांना जोडली असल्यास 60 व स्वतंत्र किंवा कनिष्ठ महाविद्यालय संलग्न असल्यास 80 करावी, दोन ठिकाणी कार्यरत असलेल्या अर्धवेळ शिक्षकांना शालार्थ मधून वेतन मिळण्याची तरतूद करावी, शिक्षक सेवकांचे मानधन वाढविण्यात यावे, सीएचबी वर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे मानधन वाढविण्यात यावे, पवित्र पोर्टल मध्ये अर्धवेळ नियुक्त शिक्षकांना त्याच महाविद्यालयात पूर्णवेळ पद निर्माण झाल्यास 3 जानेवारी 2020 च्या शासन आदेशानुसार त्यांची पूर्ण वेळ पदावर वेतनश्रेणीत नेमणूका कराव्यात, अशा मागण्यां यावेळी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...