आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:वाझेंची पाठराखण करून सभागृहाची दिशाभूल करणारे मुख्यमंत्री ठाकरे प्रायश्चित्त घेणार का? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

शिर्डी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत झाली पाहिजे

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत एटीएसच्या अहवालातून बऱ्याच गोष्टी समोर आल्‍या आहेत. त्‍यामुळे सचिन वाझेंची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याचेे उघड झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचेे प्रायश्चित्त भोगणार का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते अाणि अामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्राला जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या अतिशहाण्या सल्लागाराचा सल्ला ऐकून तरी आता चुप्पी सोडण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी केली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज्यात निर्माण झालेल्या संशयकल्लोळावर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. त्यांनी पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या थेट आरोपांबाबत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना संशय वाटत असेल तर सेवा शर्तींचा भंग केल्याबद्दल त्यांना सरकार निलंबित का करत नाही, याकडेही आ.विखे पाटील यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. मुंबईत घडलेल्या गंभीर घटनेतून गृह खात्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत सरकार अद्यापही गांभीर्य दाखवायला तयार नाही. या घटनेमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगून महाविकास आघाडीचे नेते हात वर करत असतील, तर संशयाचे भूत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव ठेवावी, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विखे पाटील म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत झाली पाहीजे, यासाठी गृहमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेण्‍याची गरजत्यांनी व्यक्त केली. हे प्रकरण केवळ गृहमंत्र्यापुरते मर्यादित नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून फक्त समान लुटीचा कार्यक्रम सुरू असून सरकारमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरू असल्याची टीका करून आ.विखे पाटील म्‍हणाले की, एवढ्या गंभीर घटनेची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनी समोर आणण्यासाठी आपल्या अतिशहाण्या सल्लागाराचा तरी सल्ला ऐकण्याचे सूचक भाष्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...