आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:संगमनेरच्या बारा गावात घुमला पोलिसांच्या बुटाचा खडखडाट

पिंपरणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मतदारसंघातील एकूण बारा गावांमध्ये सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. मतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त तैनात असणार आहे. नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करून मतदान शांततेत पार पाडावे, असे आवाहन केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी निमोण तळेगाव दिघे कोल्हेवाडी जोर्वे रहिमपूर हंगेवाडी मालुंजे अंभोरे कोळवाडे पिंपरणे धांदरफळ बु, धांदरफळ खुर्द संगमनेर मतदारसंघातील बारा गावांमध्ये सशस्त्र रूट मार्च काढला. यावेळी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण आढाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, आदींसह पोलिस अधिकारी व कर्मचारी होमगार्ड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...