आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भंडारी हल्लाप्रकरणात‎ दोघे आरोपी गजाआड‎

नगर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजरंग दलाचे पदाधिकारी कुणाल‎ सुनील भंडारी (वय २९ रा.‎ आनंदनगर, स्टेशन रोड) यांच्यावर‎ सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक‎ हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात‎ तोफखाना पोलिसांनी दोघांना अटक‎ केली. जाकीर मोहम्मद अली‎ तांबोळी (वय ४५) व नासीर शेख‎ (दोघे रा. रामवाडी) अशी अटक‎ केलेल्यांची नावे आहेत.‎ रामवाडी परिसरात सोमवारी रात्री‎ साडेदहाच्या सुमारास कुणाल भंडारी‎ यांच्यावर हल्ला झाला होता.‎

हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार‎ शस्त्राने वार केले होते. जखमी‎ भंडारी यांच्यावर येथील एका खासगी‎ रुग्णालयात उपचार सुरू असून,‎ त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या‎ जबाबावरून नासीर शेख, अल्तमेश‎ शेख, सादीक शेख मौलाना,‎ सलमान हिनू शेख, सलमान अस्लम‎ शेख, जाकीर तांबोळी, अश्फाक‎ शेख, अफजल शेख, सहेबान‎ जहागीरदार यांच्यासह अन्य २० ते २५‎ जणाविरुध्द गुन्हा दाखल केला‎ आहे. गुन्ह्याचा तपास सहायक‎ निरीक्षक विश्‍वास भान्सी करत‎ आहेत. निरीक्षक ज्योती गडकरी‎ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक‎ निरीक्षक भान्सी यांच्या पथकाने‎ मंगळवारी जाकीर तांबोळी व‎ बुधवारी नासीर शेख याला अटक‎ केली. इतरांचा शोध सुरू असल्याचे‎ पोलिसांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...