आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:दौंड-मनमाड सेक्शनमध्ये मालगाडीचे 12 डबे रुळावरुन घसरले, वाहतूक विस्कळीत

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दौंडकडून मनमाडकडे 42 डबे असलेली मालगाडी जात होती.

मनमाड-दौंड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी पहाटे मालगाडीचे 12 डबे घसरले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, यामुळे रेल्वेरुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या पुणेमार्गाने वळवण्यात आल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंडकडून मनमाडकडे 42 डबे असलेली मालगाडी जात होती. यामध्ये सिमेंट होते. दरम्यान नगर जिल्ह्यातून जात असताना श्रीगोंदा ते बेलवंडी स्टेशनच्या दरम्यान गाडीचे 12 डबे घसरले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा झाली आहे.

दरम्यान वेळापत्रकानुसार धावत असलेल्या गाड्या दुसऱ्या मार्गाने डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास उशीर थोडा उशीर लागणार आहे. अपघात झाला तेव्हा या मार्गावरून धावत असलेल्या गाड्या जवळच्या स्थानकांवर थांबवण्यात आलेल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...