आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • In Devgaon's Shriram Vidyalaya, The Teachers Flowered The Vriksha Raji; The School's Welcome Arch, Mandap, Compound Are Also Made Of Trees| Marathi News

मंडे पॉझिटिव्ह:देवगावच्या श्रीराम विद्यालयात शिक्षकांनी फुलवली वृक्षराजी; विद्यालयाची स्वागत कमान, मंडप, कंपाउंडही झाडांचेच

कुकाणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवगावच्या श्रीराम विद्यालयाच्या अडीच एकराच्या आवारात एक तप परिश्रम घेत शिक्षकांनी विविध जातींची साडेसहाशे झाडांची गर्द वनराई फुलवली आहे. ही व्रृक्षवल्ली बघुन मनाला आनंद, समाधान, शांती तर मिळतेच शिवाय या वृक्षराजींना पाहणाराही स्तंभित होतो. देवगाव हे भेंडे कारखान्याजवळचे सर्वाधिक उसाचे उत्पादन घेणारे गाव आहे.

गावापासून श्रीराम माध्यमिक विद्यालय अर्धा किलाेमीटर अंतरावर अडीच एकराचा विद्यालयाचा आवार आहे. मुरमाड जमिन टिकावाचा घाव घातला की खण्ण आवाज. पण गेल्या बारा वर्षांपूर्वी २०१० सालापासून विद्यालयाचा उघडाबोडका परिसर बदलवण्याचा निर्णय प्राचार्य श्रीधर मुरकुटे व सहशिक्षकांनी घेतला. त्यास गावकरी, पालकांनी व लगतच्या शेतकऱ्यांनी मनापासून सहकार्य केले व वेळोवेळी मदत केली.

बांबूंची ताटी, विदेशी चिंचेचे कुंपन, सप्तपर्णी, गुलमोहर, वड, पिंपळ, करंज, चिंच, रेनट्री, कडुनिंब, लक्ष्मीतुर अशी विविध ६५० झाडांची पूर्ण वाढलेली वृक्षवल्ली. आज विद्यालयाच्या आवारात मनला मोहवुन टाकत आहे. विद्यालयातील शिक्षकांसह विद्यार्थांनीही वृक्षराजी टिकवण्याकामी काळजी घेतली. प्राचार्य श्रीधर मुरकुटे, शिक्षक सुरेश शेरे, सोपान सतरकर, शिवाजी वाबळे, भगतसिंह परदेशी, तानाजी गुंजाळ, दत्तात्रय निकम, महानंदा भराट, सुनिता कर्डिले यांनी ही किमया घडवली आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले व सचिव चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासह निसर्गरम्य वातावरण केल्याचे प्राचार्य मुरकुटे यांनी सांगितले.

विद्यालयाचे आवार रमणीय
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे नगर शहर, नेवासे व शेवगाव तालुक्यात महाविद्यालये, विद्यालये आहेत. देवगावचे श्रीराम विद्यालयाचा आवार रमणीय आहे. शिक्षकांनी परिश्रमाने केलेली वनराई काैतुकास्पद आहे. संस्थेचे संस्थापक मारुतराव घुले यांच्या प्रेरणेतून शिक्षकांनी निसर्गसंवर्धक काम उभे केले आहे.'' कारभारी नजन, प्रशासकीय अधिकारी जनता शिक्षण संस्था.

बातम्या आणखी आहेत...