आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरीकरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मिरी (ता. पाथर्डी) शिवारात मोटार सायकलस्वार व त्याच्या पत्नीस कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारे दोन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल व रोख रक्कम असा ४१ हजाराचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी खरवंडी ते पाथर्डी रोडवरील फाकळी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने टाकळी फाटा येथे सापळा लावला.

तीन संशयीत इसम मोटार सायकलवर येत असताना त्यांना थांबण्याचा इशारा करताच ते पाथर्डीच्या दिशेने पळाले. पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून गेला. सचिन विजय काळे (वय २४, रा. शेवगाव), सचिन शिरसाठ भोसले (वय २५, रा. पिंपळवाडी, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेऊन पाथर्डी ठाण्यात हजर केले. पुढील तपास पाथर्डी पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...